महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोन्याच्या दरात प्रति तोळा ६६१ रुपयांची घसरण - gold rate news

सोन्यापाठोपाठ चांदीचेही दर घसरले आहेत. चांदीचे दर प्रति किलो ३४७ रुपयांनी घसरून ६७,८९४ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचे दर प्रति किलो ६८,२४१ रुपये होते.

सोने दर न्यूज
सोने दर न्यूज

By

Published : Feb 12, 2021, 4:22 PM IST

नवी दिल्ली- सोन्याच्या किमती प्रति तोळा (१० ग्रॅम) ६६१ रुपयांनी वाढून ४६,८४७ रुपये आहे. जागतिक बाजारात सोन्याचे वाढलेले दर आणि रुपयांचे वाढलेले मूल्य या कारणांनी सोन्याच्या किमती वाढ झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

सोन्यापाठोपाठ चांदीचेही दर घसरले आहेत. चांदीचे दर प्रति किलो ३४७ रुपयांनी घसरून ६७,८९४ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचे दर प्रति किलो ६८,२४१ रुपये होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरून प्रति औंस १,८१५ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २६.९६ डॉलर आहेत.

हेही वाचा-जगातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीकडून २० टक्के कर्मचारी कपातीची घोषणा

मौल्यवान रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत घसरण-

मौल्यवान रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत जानेवारीत ७.८ टक्क्यांची घसरण झाली आहे. जानेवारीत मौल्यवान रत्ने आणि दागिन्यांची एकूण २.७ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. गतवर्षी जानेवारीत २.९ अब्ज डॉलरची निर्यात झाल्याची माहिती जेम्स ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल (जीजेईपीसी) दिली आहे.

हेही वाचा-चंदा कोचर यांना ईडी विशेष न्यायालयाकडून पाच लाखांच्या जातमुचकल्यावर जामीन

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील आयात शुल्कात कपात केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details