नवी दिल्ली- सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा २९ रुपयांनी घसरून ४६,९०३ रुपये आहेत. जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याने देशातही सोन्याच्या दरात किचिंत घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून प्रति औंस १,८०५ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २६.३३ डॉलर आहेत. डॉलरचे वाढलेले मूल्य आणि अमेरिकेच्या सरकारी बाँडचे कमी झालेले व्याजदर या कारणांनी जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा-शिंदे ते सिंधिया, वक्तृत्वाच्या जोरावर छाप पाडणाऱ्या मराठमोळ्या ज्योतिरादित्य यांची जाणून घ्या राजकीय कारकीर्द
आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिर वातावरण-
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले, की मागील सत्रात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या दराने १८०० डॉलरचा टप्पा ओलांडला. ही गेल्या तीन आठवड्यात सोन्याच्या दरात सर्वाधिक वाढ होती. अमेरिकेची मध्यवर्ती बँक जूनचे पतधोरण जाहीर करणार आहे. त्यापूर्वी डॉलरचे मूल्य बाजारात अस्थिर असल्याचे दमानी यांनी सांगितले.
हेही वाचा-मराठवाड्यातील पहिले बालरोग सर्जन डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी