नवी दिल्ली- दिल्लीत सोन्याचे दर प्रति तोळा 382 रुपयांनी वधारून 46,992 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्याने देशात सोन्याच्या किमती वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 46,610 रुपये होता. चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो 1,280 रुपयांनी वाढून 66,274 रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति 64,994 रुपये होता.
हेही वाचा-शेतकऱ्याच्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार पूर्ण; सचिन तेंडुलकरने केली मदत
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे दर 382 रुपयांनी वाढले आहेत. कॉमेक्समध्ये (न्यूयॉर्कमधील कमोडिटी बाजार) सोन्याच्या किमती वाढल्याने हा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून प्रति औंस 1,817 डॉलर आहेत. तर चांदीचे दर किंचित वधारून प्रति औंस 25,42 डॉलर आहेत.
हेही वाचा-वैद्यकीय शिक्षणात ओबीसी वर्गाला 27 टक्के तर आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले, की अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर यांनी व्याजदर वाढविले नाहीत. मात्र. डॉलरवरील दबाव वाढविला आहे. त्यामुळे सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्यामध्ये अनेकांनी गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले आहे.