महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 3, 2020, 7:55 PM IST

ETV Bharat / business

सोने प्रति तोळा ७७४ रुपयांची स्वस्त; 'हे' आहे दर कमी होण्याचे कारण

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर घसरून प्रति औंस १ हजार ९३४ डॉलर आहे. तर चांदीचा दर स्थिर राहून प्रति औंस २७.२४ डॉलर आहे.

संग्रहित-
संग्रहित-

नवी दिल्ली - सोन्याच्या किमतीत प्रति तोळा ७७४ रुपयांची घसरण होऊन दिल्लीत ५१ हजार ७५५ रुपये दर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारत किमती घसरल्यानंतर देशातही सोन्याच्या किमती घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ५२ हजार ५२९ रुपये होता.

चांदीचा दर प्रति किलो १ हजार ९०८ रुपयांनी घसरून ६९ हजार १७६ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ७१ हजार ८४ रुपये होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल यांनी सांगितले, की दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ७७४ रुपयांनी घसरला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर घसरून प्रति औंस १ हजार ९३४ डॉलर आहे. तर चांदीचा दर स्थिर राहून प्रति औंस २७.२४ डॉलर आहे.

हेही वाचा-अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेसाठी देवाला दोष देणारे भाजप पहिलेच सरकार - काँग्रेस

डॉलरचा दर इतर मुख्य चलनाच्या दरात वधारल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची आकडेवारी सकारात्मक आल्यानंतर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. त्यांनी जोखीम असलेल्या गुंतवणूकीलाही पसंती दाखविण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा-'जी २० राष्ट्रसमुहात भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा सर्वात वाईट परिणाम'

ABOUT THE AUTHOR

...view details