नवी दिल्ली - सोन्याच्या दरात दिल्लीत प्रति तोळा (१० ग्रॅम) ७१७ रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर प्रति तोळा ४६,१०२ रुपये आहे. जागतिक बाजारात मौल्यवान धातुंचे दर घसरल्याने सोन्याचे दर घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचे दर प्रति तोळा १० ग्रॅमने घसरून ४६,८१९ रुपये होते. चांदीचे दर प्रति किलो १,२७४ रुपयांनी घसरून ६८,२३९ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६९,५१३ रुपये होता.
हेही वाचा-मूल्याकंनापलीकडे जाऊन विचार करा- पंतप्रधानांचा स्टार्टअप संस्थापकांना सल्ला
एचडीएफसी सिक्युरिटीजचे (कमोडिटीज) वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले की, दिल्लीत २४ कॅरेट स्पॉट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमला ७१७ रुपयांनी घसरले आहेत. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरून प्रति औंस १,७८६ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २७.१० डॉलर आहेत.