महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोने प्रति तोळा 723 रुपयांनी महाग; 'हे' आहे दरवाढीचे कारण - सोने दर न्यूज

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत. दिल्लीत 24 कॅरेटचे सोने प्रति तोळा 723 रुपयांनी वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Jul 8, 2020, 7:44 PM IST

नवी दिल्ली – सोन्याचा दर प्रति तोळा 723 रुपयांनी वाढून 49 हजार 898 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे वाढलेले दर आणि रुपयाची डॉलरच्या तुलनेत झालेली घसरण या कारणांनी देशात सोन्याचे दर वाढले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत. दिल्लीत 24 कॅरेटचे सोने प्रति तोळा 723 रुपयांनी वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले. रुपया डॉलरच्या तुलनेत 9 पैशांनी घसरून 75.02 वर पोहोचला. तर चांदीचा दर हा प्रति किलो 104 रुपयांनी वधारून 50 हजार 520 रुपये दर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस 1 हजार 800 रुपये आहे. तर चांदीचा दर प्रति औंस 18.36 रुपये आहे. कोरोनाच्या संकटाने जगभरात अनिश्चिततेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी सोने खरेदीचे प्रमाण वाढले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details