महाराष्ट्र

maharashtra

सोन्याची आयात 'फिक्कट'; सलग पाचव्या महिन्यात १०० टक्क्यांची घसरण

By

Published : May 25, 2020, 10:47 AM IST

कोरोनाच्या संकटामुळे देशात टाळेबंदी लागू केल्याने सोन्याच्या आयातीत घसरण झाली आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये ३.९७ अब्ज डॉलरच्या सोन्याची आयात झाल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे. तर यंदा एप्रिलमध्ये सोन्याची आयात २.८३ दशलक्ष डॉलर मुल्याएवढी झाली आहे.

संग्रहित - सोने आयात
संग्रहित - सोने आयात

नवी दिल्ली - सोने आयातीत जगात आघाडीवर असलेल्या भारतात सोन्याच्या आयातीत कमालीची घसरण झाली आहे. सलग पाचव्या महिन्यात सोन्याची आयात १०० टक्क्यांनी घसरली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे देशात टाळेबंदी लागू केल्याने सोन्याच्या आयातीत घसरण झाली आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये ३.९७ अब्ज डॉलरच्या सोन्याची आयात झाल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे. तर यंदा एप्रिलमध्ये सोन्याची आयात २.८३ दशलक्ष डॉलर मुल्याएवढी झाली आहे.

हेही वाचा-एअर एशिया इंडियाचे २१ शहरांसाठी विमान तिकिट बुकिंग सुरू

सोने आयातीत घसरण झाल्याने अर्थव्यस्थेचा फायदा!

मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे गतवर्षी डिसेंबरपासून सोन्याच्या आयातीत घसरण होत आहे. सोन्याची आयात घटल्याने देशाची व्यापारी तूट कमी झाली आहे. देशाची एप्रिलमध्ये ६.८ अब्ज डॉलरची व्यापारी तूट होती. तर गतवर्षी एप्रिलमध्ये व्यापारी तूट ही १५.३३ अब्ज डॉलरची होती.

हेही वाचा-किरकोळ व्यापार क्षेत्राला दोन महिन्यात ९ लाख कोटींचा फटका

आयात करण्यात आलेले सोने बहुतांश दागिने तयार करण्यासाठी वापरण्यात येते. दरवर्षी साधारणत: देशात ८०० ते ९०० टन सोन्याची आयात करण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details