महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोन्याच्या किमतीचा नवा उच्चांक! प्रति तोळा आहे 'इतकी' किंमत - Latest Silver rate

आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंचे दर वाढल्याने सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. मागणी वाढल्याने चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.

संग्रहित - सोने
संग्रहित - सोने

By

Published : Jul 22, 2020, 4:32 PM IST

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनिश्चितता असताना सोन्याच्या किमतीने नवा उच्चांक गाठला आहे. राजधानीत सोने प्रति तोळा 430 रुपयांनी वधारून 50 हजार 920 रुपये झाले आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 50 हजार 490 रुपये होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंचे दर वाढल्याने सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. मागणी वाढल्याने चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो 2 हजार 550 रुपयांनी वाढून 60 हजार 400 रुपये झाला आहे. नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 430 रुपयांनी वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस 1 हजार 855 डॉलरने वाढले आहेत. तर चांदीचा दर प्रति औंस 21.80 डॉलरने वाढले आहेत. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची खरेदी वाढली. अमेरिकेत कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या खरेदीला प्राधान्य दिल्याचे पटेल यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details