नवी दिल्ली- गेली पाच दिवस सोन्याच्या किमतीमधील घसरणीला आज ब्रेक लागला आहे. सोने प्रति तोळा ९४ रुपयांनी वाढून ४६,८७७ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीमुळे देशात सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचे दर प्रति तोळा ४६,७८३ रुपये होते. सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही वधारले आहेत. चांदीचे दर प्रति किलो ३४० रुपयांनी वधारून ६८,३९१ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ४६,७८३ रुपये किलो होता.
हेही वाचा-लग्नसराईतही सोन्याची चमक फिक्की; आठवडाभरात किमतीत दीड हजारांची घसरण