महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोन्याच्या दरात १६८ रुपयांची वाढ; चांदीत १३५ रुपयांची घसरण - gold price today

चांदीच्या दरात प्रति किलो १३५ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचे दर प्रति किलो ६६,८४१ रुपयांवरून ६६,७०६ रुपये झाले आहेत.

gold rate news
सोने दर न्यूज

By

Published : Mar 19, 2021, 7:27 PM IST

नवी दिल्ली - सोन्याच्या दरात दिल्लीत प्रति तोळा (१० ग्रॅम) १६८ रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा ४४,५८० रुपये असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४४,४१२ रुपये होता. चांदीच्या दरात प्रति किलो १३५ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचे दर प्रति किलो ६६,८४१ रुपयांवरून ६६,७०६ रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वधारून प्रति औंस १,७४१ डॉलर आहेत. चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २६.१२ डॉलर आहेत.

हेही वाचा-कोव्हिड-१९ लसचा इंग्लंडला आणखी पुरवठा करण्याचा नंतर प्रयत्न करू-सीरम

या कारणाने सोन्याचे वाढले दर-

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दामानी म्हणाले की, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने लवचिक भूमिका स्वीकारल्यानंतर सोन्याचे दर वाढले आहेत. अमेरिकेची मध्यवर्ती बँक २०२३ पर्यंत व्याजदर जवळपास शून्य टक्के ठेवेल, अशी गुंतवणुकदारांना अपेक्षा आहे.

दरम्यान, सोन्यामधील गुंतवणूक ही अत्यंत सुरक्षित मानली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमूीवर जागतिक बाजारात पुन्हा अस्थिरता होण्याची शक्यता दिसत आहे.

हेही वाचा-बीएमडब्ल्यूचेही येणार इलेक्ट्रिक मॉडेल; चालू वर्षात आय फोर होणार लाँच

ABOUT THE AUTHOR

...view details