नवी दिल्ली -सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा ४४,५०९ रुपयांनी वाढले आहेत. ही माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिली आहे. मागील सत्रात सोन्याचे दर प्रति तोळा ४४,४०४ रुपये होता.
दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचे दर १०५ रुपयांनी वाढले आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्याने हा परिणाम झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी म्हटले आहे. चांदीची किंमत प्रति किलो १,०७३ रुपयांनी वाढून ६७,३६४ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६६,२९१ रुपये होता.
हेही वाचा-शेअर बाजारात दिवसाखेर ५८५ अंशाने पडझड; टीसीएसच्या शेअरमध्ये घसरण