नवी दिल्ली- सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा 138 रुपयांनी घसरले आहेत. या घसरणीनंतर दिल्लीत ग्राहकांना प्रति तोळा सोन्यासाठी 44,113 रुपये मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुंचे दर घसरल्यानंतर सोन्याच्या दरावर परिणाम झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 44,251 रुपये होता. चांदीच्या दरात प्रति किलो 320 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचा दर प्रति किलो 63,532 रुपयांवरून 63,212 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर घसरून प्रति औंस 1,698 डॉलर आहेत. तर चांदीचे स्थिर असून प्रति औंस 24.49 डॉलर आहेत.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले की, न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंजमध्ये (कॉमेक्स) सोन्याची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.