नवी दिल्ली- सोन्याच्या दरात दिल्लीत प्रति तोळा ११८ रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर दिल्लीत सोने प्रति तोळा ४९,२२२ रुपये आहे. मागील सत्रात सोने प्रति तोळा ४९,३३९ रुपये होते.
सोन्यापाठोपाठ चांदीचे दर प्रति किलो ८७५ रुपयांनी घसरून प्रति किलो ६३,४१० रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६४,२८५ रुपये होतात. एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले, की २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ११८ रुपयांनी घसरला आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत.
कोरोना लसीला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीवर मोठा दबाव आहे. असे असले तरी आर्थिक पॅकेज आणि डॉलरचे मूल्य कमी झाल्यास सोन्याचे दर कमी होणे थांबू शकते, असेही पटेल यांनी म्हटले.