महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोन्याच्या दरात प्रति तोळा ११६ घसरण; चांदीही स्वस्त - सोने दर न्यूज

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर मागील सत्रात घसरून प्रति औंसने 1,898 डॉलरने घसरले आहेत. चांदीचे दर प्रति औंस २७.७४ डॉलरने घसरले आहेत. न्यूयॉर्कमधील कमोडिटीज एक्सचेंजमध्ये (कोमेक्स) सोन्याचे दर प्रति औंस 1,898 डॉलरने घसरले आहेत.

सोने दर न्यूज
सोने दर न्यूज

By

Published : Jun 2, 2021, 9:09 PM IST

Updated : Jun 2, 2021, 9:40 PM IST

नवी दिल्ली - सोन्याच्या दरात नवी दिल्लीत प्रति तोळा 116 रुपयांची घसरून होऊन दर 48,772 रुपये झाले आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे दर घसरल्याने देशातही सोन्याचे दर घसरल्याचेही एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

सोन्याचे दर मागील सत्रात प्रति तोळा 48,888 रुपये आहेत. चांदीचे दर प्रति किलो 1,291 रुपयांनी घसरून 70,836 रुपये झाले आहेत. मागील सत्रात चांदीचे दर प्रति किलो 72,127 रुपये आहेत.

हेही वाचा-आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू; जाणून घ्या, तज्ज्ञांचा अंदाज

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर मागील सत्रात घसरून प्रति औंसने 1,898 डॉलरने घसरले आहेत. चांदीचे दर प्रति औंस २७.७४ डॉलरने घसरले आहेत. न्यूयॉर्कमधील कमोडिटीज एक्सचेंजमध्ये (कोमेक्स) सोन्याचे दर प्रति औंस 1,898 डॉलरने घसरले आहेत. ही माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा-कोरोनाच्या काळातही वित्तीय तूट होण्यास मदत; 'ही' आहेत दोन कारणे

15 जूननंतर सोन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य -

केंद्र सरकारने 15 जूननंतर सोन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. केंद्राच्या या निर्णयाचे काही सराफा व्यापाऱ्यांनी स्वागत केले. दरम्यान, त्यांच्या काही मागण्यादेखील आहेत. कोरोनामुळे दुकाने बंद असल्याने व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे आधीचा स्टॉक विक्रीअभावी दुकानातच आहे. या मालाची विक्री करण्यासाठी सराफा व्यापारी सरकारकडून सहा महिन्यांची मुदतवाढ मागत आहेत.

Last Updated : Jun 2, 2021, 9:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details