महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोने प्रति तोळा १०४ रुपयांनी स्वस्त; चांदीच्या दरातही घसरण - सोने दर न्यूज

एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की डॉलरचे दर वधारत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीवर दबाव आहे.

सोने दर न्यूज
सोने दर न्यूज

By

Published : Dec 7, 2020, 4:24 PM IST

नवी दिल्ली -सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा १०४ रुपयांनी घसरून ४८,७०३ रुपये आहेत. जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात सोन्याचे दर उतरले आहेत.

मागील सत्रात बाजारात सोन्याचा दर प्रति तोळा ४८,८०७ रुपये होता. चांदीचा दर प्रति किलो ७३६ रुपयांनी घसरून ६३,३५७ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरून प्रति औंस १,८३६ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस हे २३.९२ डॉलर आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की डॉलरचे दर वधारत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीवर दबाव आहे.

हेही वाचा-भारत बंदमध्ये व्यापारी संघटनांसह वाहतूक क्षेत्र होणार नाही सहभागी

दरम्यान, सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. मात्र, कोरोनावर लस उपलब्ध होण्याच्या शक्यतेने जागतिक बाजारमधील अस्थिरता कमी होत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार हे जास्त जोखीम असलेल्या गुंतवणुकीकडे वळत आहेत. त्यामुळेही सोन्याचे दर घसरत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

हेही वाचा-मदरबोर्डमधून भारताची ८ लाख कोटींची निर्यात करण्याची क्षमता

ABOUT THE AUTHOR

...view details