महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

GOLD BUY करणाऱ्यांकरिता 'चांदी'; दोन महिन्यांत सोन्याचे दर सर्वात स्वस्त - सोने खरेदी

तुम्ही सोने खरेदी करण्याचे नियोजन करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर बुधवारीही घसरले आहेत.

gold rate
सोने दर

By

Published : Jun 30, 2021, 7:19 PM IST

नवी दिल्ली -सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांकरिता खूशखबर आहे. सोन्याच्या दरात दिल्लीत प्रति तोळा २६४ रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर दिल्लीत सोने प्रति तोळा ४५,७८३ रुपये आहे.

मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,०४७ रुपये होता. सोन्याच्या घसरणीनंतर चांदीच्या दरातही घसरण सुरू आहे. चांदी प्रति किलो ६० रुपयांनी घसरून ६७,४७२ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६७,५३२ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरून प्रति औंस १,७५५ डॉलर आहे. चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २५.८० डॉलर आहे.

हेही वाचा-अमूलचे दूध संपूर्ण देशात १ जुलैपासून महागणार; जाणून घ्या, नवे दर

गेल्या दोन महिन्यांत सोन्याचा दर सर्वात कमी

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की गेल्या दोन महिन्यांत सोन्याचा दर सर्वात कमी आहे. डॉलरचे मूल्य वाढत असल्याने सोन्याचे दर घसरत आहेत.

हेही वाचा-कोरोनाचा धसका : आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे ३१ जुलैपर्यंत राहणार स्थगित

सोमवारी असे होते सोने-चांदीचे दर

सोन्याचे दिल्लीत सोन्याचे दर प्रति तोळा ११६ रुपयांनी वाढून ४६,३३७ रुपये होते. तर त्यामागील मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,२२१ रुपये होता. सोन्यापाठोपाठ चांदीचे दर सोमवारी वधारले होते. चांदीचे दर प्रति किलो १६१ रुपयांनी वाढून सोमारी ६६,८५४ रुपये होते.

मंगळवारी असे होते सोने-चांदीचे दर

सोन्याचे दर मंगळवारी दिल्लीत प्रति तोळा ९९ रुपयांनी कमी होऊन ४६,१६७ रुपये राहिले होते. चांदीचे दर प्रति किलो २२२ रुपयांनी घसरून ६७,९२६ रुपये राहिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details