नवी दिल्ली - सोन्याच्या दरात नवी दिल्लीत प्रति तोळा 92 रुपयांची घसरून झाली. सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा 48,424 रुपये आहेत. ही माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिली आहे.
मागील सत्रात नवी दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा 48,516 रुपये आहे. चांदीच्या दरात प्रति किलो 414 रुपयांची घसरण होऊन दर 70,181 रुपये आहे. मागील सत्राच चांदीचा दर प्रति किलो 70,595 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर किंचित वधारून प्रति औंस 1,893 डॉलर आहे. चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस 27.65 डॉलर आहेत.
हेही वाचा-नोटा छापणे हा आरबीआयपुढे शेवटचा पर्याय असायला पाहिजे- डी. सुब्बाराव
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपान पटेल म्हणाले, की डॉलरमधील चढ-उतारामुळे सोन्याचे दर घसले आहेत. गुंतवणूकदारांना अमेरिकेच्या महागाईमधील आकडेवारीची प्रतिक्षा आहे.
हेही वाचा-जिओ वापरकर्त्यांना व्हॉट्सअपवर मिळणार लशीच्या उपलब्धतेची माहिती
15 जूननंतर सोन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य -
केंद्र सरकारने 15 जून नंतर सोन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. केंद्राच्या या निर्णयाचं काही सराफा व्यापाऱ्यांनी स्वागत केलंय. दरम्यान, त्यांच्या काही मागण्यादेखील आहेत. कोरोनामुळे दुकाने बंद असल्याने व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे आधीचा स्टॉक विक्रीअभावी दुकानातच आहे. या मालाची विक्री करण्यासाठी सराफा व्यापारी सरकारकडून सहा महिन्यांची मुदतवाढ मागत आहेत.