नवी दिल्ली -सोन्याच्या किमती पुन्हा उतरल्या आहेत. नवी दिल्लीत सोने प्रति तोळा २५२ रुपयांनी घसरून प्रति तोळा ४९,५०६ रुपये आहेत. मागील सत्रात सोन्याचा दर दिल्लीत प्रति तोळा ४९,७५८ रुपये होता.
सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीही उतरल्या आहेत. चांदीचे दर प्रति किलो ९३३ रुपयांनी घसरून ६६,४९३ रुपये प्रति किलो आहेत. यापूर्वी चांदीचा दर प्रति किलो ६७,४२६ रुपये होता. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले की, अमेरिकेत पुन्हा आर्थिक पॅकेज मिळेल अशी ग्राहकांनी आशा आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. कोरोनाचा नवीन प्रकार इंग्लंडमध्ये आढळल्याने काही देशांनी सीमा बंद केल्या आहेत.
हेही वाचा-कोरोना लस चाचणीकरता भारत बायोटेककडून १३ हजार स्वयंसेवकाची भरती