नवी दिल्ली - कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना देशात सोने-चांदीचे दर घसरले आहेत. सोन्याचा दर प्रति तोळा (१० ग्रॅम) १४९ रुपयांनी घसरून ४४,३५० रुपये आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्याने हा परिणाम झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४४,४९९ रुपये होता.
सोन्यापाठोपाठ चांदीचे दर प्रति किलो ८६६ रुपयांनी घसरले आहेत. चांदीचे दर प्रति किलो ६४,६०७ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६५,४७३ रुपये होता.
हेही वाचा-वर्षभरानंतर पहिल्यांदाच पेट्रोलच्या दरात १८ पैशांची, डिझेलमध्ये १६ पैशांची कपात
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अंशत: वाढून प्रति औंस १,७२९ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २५.१२ डॉलर आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले की, कोरोना महामारीच्या भीतीने डॉलरचे दर वधारले आहेत. असे असले तरी सोन्याचे दर घसरले आहेत.
हेही वाचा-टाळेबंदी घोषणेची वर्षपूर्ती : देशातील बेरोजगारीचे संकट कायमच
दरम्यान, सोन्यामधील गुंतवणूक ही अत्यंत सुरक्षित मानली जाते. कोरोना महामारीमुळे देशातील काही जिल्ह्यांत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. अशा स्थितीत कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, अशी गुंतवणुकदारांना चिंता वाटत आहे.