महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

तेजीतील सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; 'हे' आहे कारण - today gold silver rate

सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही घसरले आहेत. चांदीचा दर प्रति किलो 2 हजार 943 रुपयांनी घसरून 73 हजार 600 रुपये होता. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो हा 76 हजार 543 रुपये होता.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Aug 11, 2020, 8:22 PM IST

नवी दिल्ली – गेली काही दिवस तेजी सुरू असलेल्या सोन्यासह चांदीचे दर घसरले आहेत. सोन्याचा दर प्रति तोळा हा 1 हजार 317 रुपयांनी घसरून 54 हजार 763 रुपये झाला आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 56 हजार 80 रुपये होता.

सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही घसरले आहेत. चांदीचा दर प्रति किलो 2 हजार 943 रुपयांनी घसरून 73 हजार 600 रुपये होता. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो हा 76 हजार 543 रुपये होता.

या कारणांनी सोन्यासह चांदीच्या दरात घसरण

डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुंचे घसरलेले दर या कारणांनी सोन्यासह चांदीचे दर घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया हा 12 पैशांनी वधारून 74.78 रुपये झाला आहे. देशातील बाजारपेठेत सकारात्मक स्थिती झाल्याने रुपया हा सावरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस हा 1 हजार 989 डॉलरने घसरला आहे. तर चांदीचा दर हा प्रति औंस हा 27.90 डॉलरने घसरले आहेत.

दरम्यान, जागतिक अनिश्चितता, गुंतवणुकीकरता आणि पुरवठ्याबाबत चिंता असल्याने सोन्यासह चांदीच्या दराने 7 ऑगस्टला नवा उच्चांक गाठला होता. कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेमधील अनिश्चितता कायम आहे. दुसरीकडे सुरक्षित गुंतवणूक मानली जात असल्याने गुंतवणुकदारांमधून सोन्याची मागणी वाढल्याचे दिसून आले होते. तर पेरू देशांच्या खाणींमधून चादीचे उत्पादन घटल्याने चांदीच्या दरात वाढ झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details