नवी दिल्ली -सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच आहे. सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा (10 ग्रॅम) 49 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीत दिल्लीत सोने प्रति तोळा 43,925 रुपये आहे. जागतिक बाजारातील सोन्याच्या घसरणीच
सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो 331 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचा दर 62,772 रुपयांवरून 62,441 रुपये आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले की, न्यूयॉर्कमध्ये कमोडिट एक्सचेंजमध्ये सोन्याच्या विक्रीत वाढ झाली. त्यामुळे दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे दर घसरले आहेत.
हेही वाचा-पॅन-आधार लिंक नसेल तर 10 हजारापर्यंत भरावा लागू शकतो दंड; आज शेवटची तारीख