नवी दिल्ली -जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चरने शेअर विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने एअरपोर्टच्या व्यवसायातील ४९ टक्के हिस्सा टाटा ग्रुपच्या टीआरआयएल अर्बन ट्रान्सपोर्टला विकणार असल्याचे जाहीर केले आहे.
जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चरने यापूर्वी एअरपोर्ट व्यवसायामधील ४४.४४ टक्के शेअर विकण्याचा निर्णय जाहीर केला होता. जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चरने घेतलेल्या निर्णयाची शेअर बाजाराला माहिती दिली आहे. जीएमआय एअरपोर्ट लि. कंपनीने ४९ टक्के शेअर हे टीआरआयएल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लि. कंपनीला विकण्याला मान्यता दिली आहे.