महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

इंधनात दरवाढीचा भडका; मुंबईत पेट्रोलचा दर शंभरीजवळ! - petrol price news

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ६१ डॉलरहून अधिक आहेत. या दरवाढीनंतर सरकारी तेल कंपन्यांनी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे.

पेट्रोल न्यूज
पेट्रोल न्यूज

By

Published : Feb 11, 2021, 5:16 PM IST

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९४.३६ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर २५ पैशांनी तर डिझेलचे दर ३० पैशांनी वाढविले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ६१ डॉलरहून अधिक आहेत. या दरवाढीनंतर सरकारी तेल कंपन्यांनी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. दिल्लीत ग्राहकांना एक लिटर पेट्रोलसाठी ८७.८५ रुपये आहे. तर डिझेलला प्रति लिटरसाठी ग्राहकांना ७८.०३ रुपये मोजावे लागत आहेत. पेट्रोलियम उत्पादनांनी किमतीत नवा उच्चांक गाठला आहे.

हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांकाचा नवा विक्रम; रिलायन्सचे शेअर तेजीत

  • नव्या वर्षात पेट्रोलच्या किमती १५ वेळा वाढविल्याने ४.१४ रुपयांनी दर वाढले आहेत. तर डिझेलच्या किमती १५ वेळा वाढविल्याने ४.१६ रुपयांनी दर वाढले आहेत.
  • राज्यांच्या भिन्न करांमुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भिन्न आहेत.
  • पेट्रोलच्या किमती प्रति लिटर २२ ते २४ रुपयांनी तर डिझेलच्या किमती २८ ते ३१ रुपयांनी वाढल्या आहेत.
  • मुंबईत पेट्रोलच्या किमती शंभरीच्या जवळ पोहोचल्या आहेत.
  • महानगरांमध्ये डिझेलचे सर्वाधिक दर मुंबईत आहेत. मुंबईत डिझेलचे दर प्रति लिटर ८४.९४ रुपये आहेत.

हेही वाचा-अर्थसंकल्पात गरिबांसह बेरोजगारांकडे दुर्लक्ष- पी. चिदंबरम यांची राज्यसभेत टीका

सरकारी तेल कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने नुकसान टाळण्याकरता तेल कंपन्यांना दर वाढवावे लागणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details