नवी दिल्ली-पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.
तेल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या किमती प्रति लिटर ३५ पैशांनी वाढविल्या आहेत. या दरवाढीनंतर पेट्रोलचे दर प्रति लिटर ९०.९३ रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर ८१.३२ रुपये लिटर आहेत. दरवाढीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देशातील विविध शहरांमध्ये प्रति लिटर ३२ ते ४० पैशांनी वाढल्या आहेत.
हेही वाचा-पाच सत्रात शेअर बाजार निर्देशांकात २,४१० अंशांची घसरण; ही आहेत चार कारणे
- देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर ९ फेब्रुवारीपासून वाढत आहेत. या १२ दिवसांमध्ये पेट्रोल दिल्लीत प्रति लिटर ३.६३ रुपयांनी महागले आहे. तर डिझेल प्रति लिटर ३.८४ रुपयांनी महागले आहे.
- मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९७.३४ रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ८८.४४ रुपये आहे.
- महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि राजस्थानमधील काही शहरांमध्ये प्रिमियम पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक आहेत.
- नवीन वर्षात पेट्रोल व डिझेलच्या किमती २५ वेळा वाढविण्यात आल्या आहेत. या दरवाढीनंतर पेट्रोलचे दर प्रति लिटर ७.२२ रुपयांनी तर डिझेलचे दर ७.४५ रुपयांनी वाढले आहे.
- कच्च्या तेलाचा दर मंगळवारी प्रति बॅरल ६७ डॉलर होता. कच्च्या तेलाचा दर आज प्रति बॅरल ६० डॉलर आहे.
हेही वाचा-शेअर बाजारातील घसरणीचा फटका; गुंतवणुकदारांनी गमाविले ३.७ लाख कोटी