नवी दिल्ली- तीन दिवसांच्या 'ब्रेक'नंतर देशात पेट्रोल व डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. देशात पेट्रोल व डिझेलच्या किमतीने नवा उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसली आहे.
सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलचे दर प्रति लिटर २४ पैशांनी तर डिझेलचे दर १५ पैशांनी वाढविले आहेत. या दरवाढीनंतर पेट्रोलची किंमत नवी दिल्लीमध्ये प्रति लिटर ९१.१७ रुपये तर डिझेलची किंमत प्रति लिटर ८१.४७ रुपये आहे. देशात पेट्रोल आणि डिझलचे दर प्रति लिटर २० ते ३० पैशांनी वाढले आहेत. विविध राज्यांत इंधनावरील उपकराचे प्रमाण भिन्न असल्याने इंधनाच्या किमती वेगवेगळ्या आहेत.
हेही वाचा-वैयक्तिक गोपनीयतेचा भंग; टिकटॉक अमेरिकेतील राज्याला देणार ९२ दशलक्ष डॉलर
- सरकारी तेल विपणन कंपनीमधील (ओएमसी) सुत्राच्या माहितीनुसार जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढून प्रति बॅरल ६६ डॉलरवर पोहोचल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ६० डॉलर होता.
- देशात पेट्रोल व डिझेलच्या किमती १ फेब्रुवारीपासून चौदा वेळा वाढल्या आहेत. या दरवाढीने पेट्रोल प्रति लिटर ४.२२ रुपयांनी महागले आहे. तर डिझेलचे दर प्रति लिटर ४.३४ रुपयांनी महागले आहे.
- मागील आठवड्यात देशातील विविध शहरांमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०० रुपयांवर पोहोचली आहे.
- मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९७.५७ रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ९० रुपये आहे.
- देशातील बहुतांश शहरात पेट्रोलचा दर प्रति लिटर ९० रुपयांहून अधिक आहेत. तर डिझेलचा दर प्रति लिटर ८० रुपयांहून अधिक आहेत.
- २०२१ मध्ये पेट्रोल व डिझेलचे दर सव्वीस वेळा वाढले आहेत. या दरवाढीनंतर पेट्रोलचे दर प्रति लिटर ७.४६ रुपये तर डिझेलचे दर ७.६० रुपयांनी वाढले आहेत.