महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

विदेशी गुंतवणूकदार संस्थांची भांडवली बाजाराकडे पाठ; काढून घेतले ७ हजार ७१२ कोटी - Marathi Business News

मंदावलेला आर्थिक विकासदर (जीडीपी), एशियन डेव्हलपमेंट बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेची गती कमी होण्याचा वर्तविलेला अंदाज यामुळे विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवल काढून घेतले आहे.

प्रतिकात्मक

By

Published : Jul 21, 2019, 12:54 PM IST

नवी दिल्ली - विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारातून जुलैमध्ये ७ हजार ७१२ कोटी रुपये काढून घेतले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात अतिश्रीमंतावर कर प्रस्तावित केला असल्याने चिंताग्रस्त गुंतवणुकदारांनी शेअरची विक्री केली आहे.


जानेवारी ते मे महिन्यादरम्यान विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय भांडवल बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी कर्ज रोख्यात (डेबिट सेगमेंट) ९ हजार ३७१.१२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर शेअर बाजारातून ७ हजार ७१२ कोटी रुपये काढून घेतले आहेत. यामुळे इक्विटी आणि डेबिट मार्केटमध्ये विदेशी गुंतवणुकदारांची निव्वळ १ हजार ६५९ कोटी रुपयांची गुंतवणूक राहिली आहे.

मॉर्निंग स्टारचे वरिष्ठ विश्लेषक व्यवस्थापक हिमांशू श्रीवास्तव म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्पात अतिश्रीमंतांवर कर लागू करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. त्याबाबत सरकारकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदार शेअरची विक्री करत आहेत. तसेच मंदावलेला आर्थिक विकासदर (जीडीपी), एशियन डेव्हलपमेंट बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेची गती कमी होण्याचा वर्तविलेला अंदाज यामुळे विदेशी गुंतवणुकदार संस्थांनी भांडवल काढून घेतले आहे. तसेच असमाधानकारक मान्सून या घटकाचाही गुंतवणुकीवर परिणाम झाल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details