नवी दिल्ली- निवडणुकीनंतर येणारी अस्थिरता आणि अमेरिका-चीनच्या व्यापारी युद्धाचा भारतीय शेअर बाजाराला फटका बसला आहे. विदेशी गुंतवणुकदार संस्थांनी मे महिन्यात भांडवली बाजारातून ६ हजार ३९९ कोटी रुपये काढून घेतले आहेत.
भांडवली बाजाराला अस्थिरतेचा फटका ; विदेशी गुंतवणुकदारांनी काढून घेतले ६ हजार ३९९ कोटी रुपये! - FPI
निवडणुकीच्या निकालाबाबत अनिश्चितता असल्याने आर्थिक प्रगती मंदावल्याचे चित्र आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणुकदारांनी थांबा आणि पाहा असे धोरण स्विकारल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
गेली तीन महिने विदेशी गुंतवणुकदार संस्थांनी भारतीय भांडवली बाजारामधील गुंतवणुकीला प्राधान्य दिले होते. एप्रिलमध्ये १६ हजार ९३ कोटी तर मार्चमध्ये ४५ हजार ९८१ कोटी तर फेब्रुवारीमध्ये ११ हजार १८२ कोटी रुपयांची गुंतवणूक विदेशी गुंतवणुकदार संस्थांनी केली होती. मात्र हे चित्र पूर्णपणे मे महिन्यामध्ये बदलले आहे. विदेशी गुंतवणुकदार संस्थांनी (एफपीआय) २ मे ते १७ मे दरम्यान ६ हजार ३९९ कोटी रुपये भांडवली बाजारातून काढून घेतले आहेत.
निवडणुकीच्या निकालाबाबत अनिश्चितता असल्याने आर्थिक प्रगती मंदावल्याचे चित्र आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणुकदारांनी थांबा आणि पाहा असे धोरण स्विकारल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. . अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्धामुळे गुंतवणुकदारांची चिंता वाढविल्याचे बाजार विश्लेषक हिंमाशू श्रीवास्तव यांनी सांगितले. चलनाची कमी तरलता आणि मंदावलेल्या आर्थिक प्रगतीने भारतीय भांडवली बाजारातील गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आहे. हे भारतीय अर्थव्यवस्थेचे चांगले चित्र नसल्याचेही ते म्हणाले.