महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 21, 2019, 7:56 PM IST

ETV Bharat / business

दुबईला प्रायोगिक तत्वावर १४ मेट्रिक टन भाजीपाल्याची निर्यात

शेतमालाची निर्यात करण्यासाठी वाराणसीजवळ निर्यात केंद्र उभारण्यात येत आहे. त्यामधून निर्यातीसाठी समन्वय आणि सुविधा देण्यात येणार आहेत.

vegetables carrying truck
वाराणसीहून ट्रक मुंबईला रवाना होताना

नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून शेतीमालाची निर्यात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून भाजीपाल्याचा कंटेनर सागरी मार्गाने आज जहाजातून पाठविण्यात आला.


मुंबईहून सागरी मार्गाने कंटेनर दुबईला पाठविण्यात आला आहे. तर भाजीपाला हा गाझीपूर आणि वाराणसीमधून आणण्यात आलेला होता. कंटेनरमध्ये १४ मेट्रिक टन ताजा भाजीपाला होता. कृषी आणि अन्नप्रक्रिया निर्यात विकास प्राधिकरणाकडून (अपेडा) शेतमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. हा शेतमाल प्रायोगिक तत्वावर पाठविण्यात आल्याचे अपेडाने म्हटले आहे.

हेही वाचा-'जागतिक बलाढ्य किरकोळ विक्रेत्यांमुळे देशातील सहा कोटी दुकानदारांना धोका'

शेतमालाची निर्यात करण्यासाठी वाराणसीजवळ निर्यात केंद्र उभारण्यात येत आहे. त्यामधून निर्यातीसाठी समन्वय आणि सुविधा देण्यात येणार आहेत. तर वाराणसी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, देशात भाजीपाल्यांचे दर अचानक वाढले आहेत. अन्नधान्यासह कांद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.

हेही वाचा-डाटा लीक झाल्याचा गुगलपाठोपाठ ट्विटरचा भारतीयांना इशारा

दरम्यान, सौदी अरेबिया भाजीपाल्यांसाठी संपूर्णपणे आयातीवर अवलंबून असलेला देश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details