महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 26, 2019, 8:00 PM IST

ETV Bharat / business

शेअर बाजारातील तेजीने गुंतवणुकदारांची 'चांदी'; संपत्तीत १.५७ लाख कोटींची पडली भर

भारतीय शेअर बाजाराने बुधवारच्या घसरणीनंतर आज सावरून नफा नोंदविला आहे. आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर ऑटो, बँका आणि धातुंचे शेअर वधारल्याचे जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.

संग्रहित - पैसे

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे ४०० अंशाने वधारल्याने गुंतवणुकदारांनी आज चांगली कमाई केली आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकदारांच्या संपत्तीत एकूण १.५७ लाख कोटींची भर पडली आहे.


निर्देशांक ३९६.२२ अंशाने वधारून शेअर बाजार ३८,९८९.७४ वर बंद झाला. दिवसभरात एकदा ५६४.५५ अंशाने निर्देशांक वधारून ३९,१५८.०७ वर पोहोचला होता. शेअर बाजार निर्देशांक वधारण्यापूर्वी सूचिबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे १ लाख ५७ हजार ९१.३१ कोटी रुपये होते. निर्देशांक वधारल्यानंतर कंपन्यांचे भांडवली मूल्य हे १ कोटी ४८ लाख ४५ हजार ८५४.७० कोटी रुपये झाले.

हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांक ३९६ अंशाने वधारून बंद; उपलब्धकालीन शेअरची मुदत संपल्याचा परिणाम


अमेरिकेतील राजकीय नाट्यानंतर बुधवारी शेअरमध्ये ५०४ अंशाची घसरण झाली होती. भारतीय शेअर बाजाराने सावरून आज नफा नोंदविला आहे. आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर ऑटो, बँका आणि धातुंचे शेअर वधारल्याचे जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले. स्थानिक प्रोत्साहन आणि व्यापार युद्धातील निवळणारा तणाव यांच्या मिश्रणाने बाजारात सकारात्मकता दिसून आल्याचे नायर यांनी सांगितले.

हेही वाचा-'या' कारणाने आर्थिक संकटात सापडलेल्या आयएल अँड एफएसची एनएसीएलएटीमध्ये धाव


अशी होती शेअर बाजारामधील कंपन्यांची कामगिरी
वेदांत, एम अँड एम, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील आणि मारुतीचे शेअर हे ६.४७ टक्क्यापर्यंत वधारले. शेअर बाजारातील ३० आघाडीच्या कंपन्यापैकी २३ कंपन्यांच्या शेअरची खरेदी अधिक प्रमाणात झाली. बीएसईमधील १ हजार २७३ कंपन्यांचे शेअर वधारले. तर १ हजार २४३ कंपन्यांचे शेअर घसरले. बाजारातील १६३ कंपन्यांच्या शेअरचे दर स्थिर राहिले.

हेही वाचा-पीएमसीच्या खातेदारांना दिलासा; खात्यामधून १० हजार रुपयापर्यंत काढता येणार रक्कम

ABOUT THE AUTHOR

...view details