मुंबई- शेअर बाजार निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. शेअर बाजार निर्देशांक ३०० अंशाने घसरून ३८,५१०.६४ वर पोहोचला. वित्तीय कंपन्या, धातू आणि वाहन कंपन्यांच्या शेअरची विक्री अधिक झाल्याने शेअर बाजारात घसरण झाली आहे.
शेअर बाजार निर्देशांकात सकाळच्या सत्रात ३०० अंशाची घसरण; ऑटोसह धातुंच्या शेअर विक्रीचा परिणाम
चिनी कंपन्यांना अमेरिकन शेअर बाजाराच्या सूचिबद्ध यादीतून वगळण्यावर अमेरिका विचार करत आहे. अमेरिका व चीनमध्ये व्यापारी युद्ध आणखी भडकण्याची शक्यतेने आशियामधील शेअर बाजारांमध्ये घसरण होत आहे.
चिनी कंपन्यांना अमेरिकन शेअर बाजाराच्या सूचिबद्ध यादीतून वगळण्यावर अमेरिका विचार करत आहे. याचा परिणाम म्हणून आशियामधील शेअर बाजारांमध्ये घसरण होत आहे. अमेरिका व चीनमध्ये व्यापारी युद्ध आणखी भडकण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. येस बँक, इंडसइंड बँक, टाटा स्टील, सन फार्मा, वेदांत आणि टाटा मोटर्स या कंपन्यांचे शेअर घसरले. तर आयटी कंपन्या एचसीएल टेक, टीसीएस आणि इन्फोसिसचे शेअर वधारले.
शेअर बाजार निर्देशांक सकाळी पावणेदहा वाजता मागील सत्राच्या तुलनेत ३११.९३ अंशाने घसरून ३८,५१०.६४ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक मागील सत्राच्या तुलनेत ८६.२५ अंशाने घसरून ११,४२६.१५ वर पोहोचला.