महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

इलेक्ट्रिक कार नॉर्वेत होतेय लोकप्रिय, सरकारच्या प्रयत्नांना मोठे यश

सध्या संपूर्ण जग प्रदूषणाचा सामना करत आहे. प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सर्व देश या समस्येवर मात करण्यासाठी आपआपल्या परीने प्रयत्न करत आहेत. भारतासमेवत जगभरातील देश इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर भर देत आहेत.

सांकेतिक छायाचित्र

By

Published : Mar 28, 2019, 9:42 PM IST

ऑटो डेस्क - सध्या संपूर्ण जग प्रदूषणाचा सामना करत आहे. प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सर्व देश या समस्येवर मात करण्यासाठी आपआपल्या परीने प्रयत्न करत आहेत. भारतासमेवत जगभरातील देश इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर भर देत आहेत.

नॉर्वेची राजधानी ओस्लो सध्या जगातील पहिले शहर बनले आहे जेथे वायरलेस चार्जिंग सिस्टमच्या माध्यमातून इलेक्ट्रिक टेक्सीला चार्ज करता येऊ शकते. प्रदूषणावर आळा घालता यावा यासाठी नॉर्वेच्या सरकारने एक प्रॉजेक्ट तयार केले आहे. या प्रॉजेक्टला मोठे यश मिळाले आहे. आता येथे इलेक्ट्रिक कार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरत आहेत. नागरिकही या कारच्या खरेदीला पसंती देत आहेत.

नॉर्वे सरकारने इलेक्ट्रिक कार चार्जिंगचे इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत आणि आणखीन चांगले करण्यावर सातत्याने भर दिला. यासह त्यांनी नागरिकांना इलेक्ट्रिक कार घेण्यासाठी प्रोत्साहित केले. यासाठी त्यांनी गाड्याच्या किमती आणि करावर सवलती दिल्या. सरकारच्या प्रयत्नांना नागरिकांनीही भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details