हैदराबाद- दिवाळीत हिंदू वर्ष अर्थ नवीन विक्रम संवत्सराची सुरुवात होणार आहे. त्यामुळे देशभरातील व्यापारी धन आणि समृद्धीचे प्रतिक असलेल्या देवी लक्ष्मीची पुजा करून नवीन खाते सुरू करतात. त्याच पद्धतीने भारत शेअर बाजाराकडून या परंपरेचे पालन करत मुहूर्त ट्रेडिंग करण्यात येणार आहे.
गुंतवणुकदारांना एका तासासाठी विशेष व्यापारी खिडकी शेअर खरेदी व विक्री करण्यासाठी सुरू केली जाते. त्याला मुहूर्त व्यापार (ट्रेडिंग) म्हटले जाते. हा दिवस शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. इक्विटी, इक्विटी फ्यूचर्स आणि कमोडिटीजसाठी 4 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 6.15 ते 7.15 दरम्यान मुहूर्त ट्रेडिंग(Muhurat Trading Session) सत्र आयोजित होणार आहे.
हेही वाचा-DIWALI 2021: महाराष्ट्रातील देश-विदेशातील महागड्या मिठाई.. 'या' 10 मिठाईंची किंमत ऐकून बसेल धक्का
यंदा संवस्तर 2078 या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. शेअर बाजारात या दिवशी सुख आणि समृद्धी येत असल्याचे मानले जाते. कोरोनाच्या काळातही शेअर बाजाराचा निर्देशांक सातत्याने वधारला आहे.