महाराष्ट्र

maharashtra

सलग तिसऱ्या दिवशी दरवाढ; डिझेल एकूण ५० पैशांनी महाग

By

Published : Dec 21, 2019, 2:19 PM IST

चालू महिन्यात जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या बॅरलच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात ग्राहकांना दिलासा मिळण्याची कमी शक्यता आहे.

Diesel prices surge
डिझेल दरवाढ

नवी दिल्ली -सलग तिसऱ्या दिवशी आज डिझेलचे दर वाढले आहेत. तर सलग चौथ्या दिवशी पेट्रोलचे दर स्थिर राहिले आहेत. मुंबईत डिझेल प्रति लिटर हे ६९.८० रुपये झाले आहे.

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी डिझेलचे दर वाढविले आहेत. त्यामुळे दिल्ली व कोलकात्यामध्ये २० पैशांनी डिझेल महागले आहे. तर मुंबई आणि चेन्नईमध्ये २१ पैशांनी डिझेल महागले आहे.


इंडिया ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटनुसार प्रति लिटिर डिझेलचे दर (रुपयामध्ये)

  • नवी दिल्ली- ६६.५४
  • कोलकाता- ६८.९५
  • मुंबई -६९.८०
  • चेन्नई-७०.३४

पेट्रोलचे दर आज स्थिर राहिले आहेत. दिल्लीत पेट्रोल प्रति लिटिर ७४.६३ रुपये, कोलकात्यामध्ये ७७.२९ रुपये, मुंबईत ८०.२९ रुपये आहे. तर चेन्नईत पेट्रोल प्रति लिटर ७७.५८ रुपये आहे.

हेही वाचा-कांदे भाववाढीनंतर महागणार फोडणीचाही 'तडका'

चालू महिन्यात जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या बॅरलच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात ग्राहकांना दिलासा मिळण्याची कमी शक्यता आहे. डिसेंबरमध्ये जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे बॅरल ६ डॉलरने वाढले आहेत. असे असले तरी शुक्रवारी कच्च्या तेलाच्या बॅरलचे दर मागील सत्राच्या तुलनेत ०.७५ टक्क्यांनी कमी होते.

हेही वाचा-...म्हणून फोक्सवॅगनला ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयाकडून ६१२ कोटी रुपयांचा दंड

ABOUT THE AUTHOR

...view details