नवी दिल्ली- सरकारी खनिज तेल मार्केटिंग कंपन्यांनी डिझेलचे दर कमी केले आहेत. दिल्लीत डिझेलचे दर प्रति लिटर ११ पैशांनी कमी झाले आहेत. दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर ७३.१६ रुपये आहे. तर पेट्रोलचे दर स्थिर राहिले आहेत.
डिझेलचा दर गुरुवारीही प्रति लिटर १६ पैशांनी कमी झाला होता. तर शनिवारीही डिझेलचा दर प्रति लिटर १३ पैशांनी कमी झाला होता. डिझेलचे दर कमी होत असताना पेट्रोलचे दर कंपन्यांनी स्थिर ठेवले आहेत. पेट्रोलचे दर जवळपास महिनाभर स्थिर ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी १६ ऑगस्टपासून पेट्रोलचे दर नियमितपणे वाढले होते.
दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर १६ ऑगस्टला ८०.५७ रुपये होता. दिल्लीत पेट्रोलचा दर आज ८२.०८ रुपये आहे.