महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

महागाई: राजधानीत डिझेल पेट्रोलहून महाग, वाचा काय आहे दर - petrol prices in New Delhi

गेल्या काही आठवड्यांपासून मागणी कमी होवूनही नवी दिल्लीत डिझेलचे दर अनेपेक्षितपणे वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरातील तफावत कमी झाली आहे.

संग्रहित - पेट्रोल दरवाढ
संग्रहित - पेट्रोल दरवाढ

By

Published : Jul 18, 2020, 2:13 PM IST

नवी दिल्ली - सरकारी तेल मार्केटिंग कंपनीने नवी दिल्लीत डिझेलचे दर 17 पैशांनी वाढविले आहेत. त्यामुळे राजधानीत डिझेलचे दर पेट्रोलहून सुमारे एका रुपयांनी जास्त आहेत. तर पेट्रोलचे दर आज 'जैसे थे' राहिले आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून मागणी कमी होवूनही नवी दिल्लीत डिझेलचे दर अनेपेक्षितपणे वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरातील तफावत कमी झाली आहे. गेल्या महिन्यांत नवी दिल्लीत पहिल्यांदाच डिझेलचे दर पेट्रोलहून अधिक झाले होते.

नवी दिल्ली पेट्रोलचा दर शनिवारी प्रति लिटर 81.52 रुपये आहे. यापूर्वी डिझेलचा दर प्रति लिटर 81.35 रुपये होता. तर पेट्रोलचे दर प्रति लिटर 80.43 रुपयावर स्थिर राहिले आहेत. हे दर 29 जुलैच्या दराएवढे आहेत.

दिल्लीपाठोपाठ इतर महानगरांमध्ये डिझेलचे दर वाढले आहेत. असे असले तरी महानगरांमध्ये डिझेलचा दर हा पेट्रोलहून प्रति लिटर हा 6 ते 8 रुपयांहून कमी आहे. सरकारी तेल मार्केटिंग कंपनीने 7 जूनपासून इंधनाचे दर वाढविण्याला सुरुवात केली आहे. तेव्हापासून पेट्रोल प्रति लिटर 9.5 रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर 11.5 रुपयांनी महागले आहेत. त्यापूर्वी 82 दिवस पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर राहिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details