नवी दिल्ली -देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. डिझेलच्या किमती दिल्लीत प्रति लिटर ७३ रुपयांहून अधिक आहेत. तर गेल्या पंधरा दिवसात बाराव्यांदा दर वाढविल्याने पेट्रोलचा दर प्रति लिटर जवळपास ८३ रुपये आहे.
पेट्रोलच्या किमती शुक्रवारी प्रति लिटर २० पैशांनी तर डिझेलच्या किमती २३ पैशांनी वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने इंधनाचे दर देशात वाढले आहेत.
हेही वाचा-पुन्हा रेपो रेट जैसे थे! विकासदर उणे ७.५ होण्याची शक्यता..
- दिल्लीत पेट्रोलचे दर आज ८२.६६ रुपयांवरून ८२.८६ रुपये आहे. तर डिझेलचा दर ७२.८४ रुपयांवरून ७३.०७ रुपये आहे.
- तेल कंपन्यांनी बाराव्यांदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढविले आहेत.
- गेल्या पंधरा दिवसात पेट्रोलचे दर प्रति लिटर १.८ रुपयांनी वाढले आहे. तर डिझेलचे दर प्रति लिटर २.६१ रुपयांनी वाढले आहे.
- मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८९.५२ रुपयांवरून ८९.३३ रुपये आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर ७९.४२ रुपयांवरून ७९.६६ रुपये प्रति लिटर आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा सरकारी कंपन्यांकडून रोज आढावा घेतला जातो. त्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीतील दर बदलण्यात येतात.