मुंबई- खनिज तेलाचे दर भारतात पाण्यापेक्षा स्वस्त झाले आहे. जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर आज ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे भारतीय फ्युच्युअर्स बाजारात दुपारी २ वाजता खनिज तेलाच्या प्रति बॅरलची किंमत २, ५०० रुपये झाली आहे.
आखाती युद्ध १९९१ मध्ये पेटल्यानंतर खनिज तेलाच्या दराने तळ गाठला होता. त्यानंतर प्रथमच खनिज तेलाचे दर एका दिवसात आज कमी झाले आहेत. खनिज तेलाच्या एका बॅरलमध्ये सुमारे १५९ लिटर तेल असते. खनिज तेलाची एका बॅरलची किंमत २,५०० रुपये आहे. त्यामुळे खनिज तेलाची प्रति लिटर किंमत १५ ते १६ रुपये आहे. तर देशात १ लिटर पाण्याच्या बॉटलसाठी ग्राहकांना २० रुपये मोजावे लागतात.
हेही वाचा-शेअर बाजारात २ हजार अंशांच्या 'घसरणीचा कंप'; गुंतवणूकदारांनी गमावले ५ लाख कोटी रुपये
खनिज तेलाचे उत्पादक असलेल्या राष्ट्रांची संघटना ओपेकमध्ये खनिज तेलाच्या उत्पादनावरून मतैक्य होवू शकले नाही. त्यामुळे रशियाने मागणी कमी झाली असतानाही खनिज तेलाचे उत्पादन कमी केलेले नाही. कोरोनामुळे घटलेली मागणी व खनिज तेलाची सुरू असलेली आवक या कारणाने खनिज तेलाचे दर अचानक कोसळले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) खनिज तेलाचे दर ९९७ रुपयांनी घसरले आहेत.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या आजचे दर
सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त
आंतरराष्ट्रीय तेल बाजारात खनिज तेलाच्या किंमतींमध्ये तब्बल ३० टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले आहेत. पेट्रोलचे दर प्रति लिटर २४ पैशांनी कमी झाले आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर २६ पैशांनी कमी झाले आहेत.