महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अभूतपूर्व : 'फ्रँकलिन टेम्पलेटन'ने सहा म्युच्युअल फंडच्या गुंतवणूक योजना केल्या बंद - Mutual Fund

कोरोनोच्या संकटाने काही कॉर्पोरेटच्या श्रेणीतील तरलतेत नाट्यमरित्या घसरण झाली आहे. म्युच्युअल फंड या निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या प्रकारात सतत दबाव वाढत चालल्याचे फ्रँकलिन टेम्पलेटन एमएफने म्हटले आहे.

म्युच्युअल फंड
म्युच्युअल फंड

By

Published : Apr 24, 2020, 1:38 PM IST

नवी दिल्ली- कोरोनाच्या संकटात फ्रँकलिन टेम्पलेटन म्युच्युअल फंडने स्वेच्छेने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी सहा कर्जाच्या योजना (डेबिट फंड) बंद केल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे बाँडच्या बाजारात चलनाची कमी असलेली तरलता आणि युनिट मागे घेण्याचा वाढणारा दबाव, यामुळे असा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे.

देशात पहिल्यांदाच एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीने कोरोनाच्या संकटामुळे योजना रद्द केली आहे. कोरोनोच्या संकटाने काही कॉर्पोरेटच्या श्रेणीतील तरलतेत नाट्यमरित्या घसरण झाली आहे. म्युच्युअल फंड या निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या प्रकारात सतत दबाव वाढत चालल्याचे फ्रँकलिन टेम्पलेटन एमएफने म्हटले आहे.

हेही वाचा-अमेरिकेची अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची ट्रम्प यांची भूमिका

इतर म्युच्युअल फंड कंपन्याही योजना बंद करतील, अशी गुंतवणूकदारांना भीती आहे. बाजार नियमन करणाऱ्या सेबीने डेबिट म्युच्युअल फंडसाठी गुरुवारी नियम शिथील केले आहेत.

हेही वाचा-बँक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सहा महिन्यापर्यंत करता येणार नाही संप, कारण...

ABOUT THE AUTHOR

...view details