महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

हॉटेलमध्ये वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 266 रुपयांची वाढ - एलपीजी गॅस सिलिंजर दर

गेल्या महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरचे दर 15 रुपयांनी वाढले होते. दिल्लीत 14.2 किलोच्या बिगर अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहेत. नव्या दरवाढीमुळे गॅस सिलिंडरचे दर 502 रुपये आहेत.

गॅस सिलिंडर दर
गॅस सिलिंडर दर

By

Published : Nov 1, 2021, 3:46 PM IST

नवी दिल्ली- व्यावसायिक कामासाठी वापरण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडरची (price of commercial LPG gas) किंमत 266 रुपयांनी वाढणार आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरचे दर 'जैसे थे' ठेवण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरचे दर 15 रुपयांनी वाढले होते. दिल्लीत 14.2 किलोच्या बिगर अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहेत. नव्या दरवाढीमुळे गॅस सिलिंडरचे दर 502 रुपये आहेत. दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,734 रुपयांवरून 2 हजार रुपये होणार आहे. र आहे.

हेही वाचा-दिवाळीमध्येच सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ; 'हे' आहेत आजपासून नवीन नियम

महागाईचा भडका -

सर्वसामान्य कोरोनाच्या महामारीच्या संकटात विविध समस्यांना सामोरे जात असताना महागाईनेही त्रस्त झाला आहे. खाद्यतेल आणि एलपीजी सिलिंडरच्या किमतींनी गेल्या तीन वर्षातील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. दैनंदिन जीवनात लागणारे खाद्यतेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. विविध शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत वेगवेगळी आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी इत्यादी ठिकाणी करण्यात येतो.

हेही वाचा-महागाईचे संकट: एलपीजीसह पेट्रोल-डिझेलचे दर पुढील आठवड्यात वाढण्याची शक्यता

सरकारचे एलपीजीच्या दरावर नियंत्रण-

एलपीजीचे दर हे सरकारकडून नियंत्रणात आहेत. तांत्रिकदृष्ट्या केंद्र सरकारकडून गॅस सिलिंडरच्या किरकोळ विक्रीतील किमतीवर नियंत्रण ठेवू शकते. केंद्र सरकारने गतवर्षी एलपीजीवरील अनुदान हटवून एलपीजीच्या किमती बाजाराएवढ्या आणल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलप्रमाणे केंद्र सरकारने एलपीजी दरावरील नियंत्रण सोडलेले नाही. मात्र, सरकारकडून अनुदान मिळत नसल्याने सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांना एलपीजीचे दर वाढवावे लागणार असल्याचे सूत्राने सांगितले.

हेही वाचा-Paytm आणणार 16,600 कोटींचा IPO, गुंतवणूकदारांसाठी यंदाच्या दिवाळीमध्ये मोठी संधी

ABOUT THE AUTHOR

...view details