मुंबई- कोरोनाच्या रुग्णांची संख्या जगभरात वाढत असल्याने मुंबई शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १,३०० अंशांनी घसरला आहे.
महामारी कोरोनामुळे जग हे मंदीत पोहोचल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नुकतेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. मुंबई शेअर बाजार १,३७५.२७ अंशांनी घसरून २८,४४०.३२ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक हा ३७०.६० अंशांनी घसरून ८,२८९.६५ वर स्थिरावला.
हेही वाचा-कोरोना संकट: कर्मचाऱ्यांना काढता येणार भविष्य निर्वाह निधीतील रक्कम
मागील सत्रात मुंबई शेअर बाजार निर्देशांक १३१.१८ अंशांनी घसरून २९,८१५.५९ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक १८.८० अंशांनी घसरून ८,६६०.२५ वर स्थिरावला होता.
आयएमएफने असा दिला आहे इशारा-
जागतिक अर्थव्यवस्था अचानक थांबल्याने विकसित होणाऱ्या बाजारपेठांना सुमारे २.५ लाख कोटी डॉलरची आवश्यकता आहे. अनेक देशांमधील स्त्रोत अपुरे आहेत, असे त्यांनी सांगितले. अनेक देशांवर कर्जाचा बोझा आहे, याकडेही ख्रिस्टिलिना जॉर्जिव्हिया यांनी लक्ष वेधले आहे.कोरोना महामारीने जागतिक अर्थव्यवस्थेची घसरण झाली आहे. त्यामुळे विकसनशील देशांना मोठ्या निधीची गरज लागणार असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमख ख्रिस्टिलिना जॉर्जिव्हिया यांनी सांगितले. आपण मंदीत प्रवेश केला आहे, हे स्पष्ट आहे. ही मंदी २००९च्या जागतिक मंदीहून वाईट असेल, असा त्यांनी इशारा दिला आहे.
हेही वाचा-संचारबंदी परिणाम : ...म्हणून घरगुती गॅस सिलिंडरची मागणी वाढली