मुंबई - गेल्या काही दिवसांपासून तेजीत असलेल्या शेअर बाजारात आज विक्रीच्या दबावामुळे मोठी पडझड नोंदवली गेली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1066 अंशानी घसरला. निफ्टीमध्येही 290 अंशांची घसरण झाली. मोठ्या पडझडीमुळे बाजार बंद होताना सेन्सेक्स 40 हजारांच्या खाली उतरून 39,728 अंशांवर तर निफ्टी 11,680 अंशांवर स्थिरावला.
शेअर बाजाराची घसरगुंडी, सेन्सेक्सची 1066 अंशानी आपटी - सेन्सेक्स डाऊन
मुंबई शेअर बाजारात एशियन पेंट्स वगळता इतर सर्व शेअर लाल इशाऱ्यावर आज बंद झाले. गेल्या दहा दिवसात कमावलेला सर्व पैसा पाण्यात गेल्याचे चित्र दिसून आले.
मुंबई
मुंबई शेअर बाजारात एशियन पेंट्स वगळता इतर सर्व शेअर लाल इशाऱ्यावर आज बंद झाले. गेल्या दहा दिवसात कमावलेला सर्व पैसा पाण्यात गेल्याचे चित्र होते. एका दिवसात गुंतवणूकदारांचे 2.7 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा -खाद्यपदार्थांच्या उच्च दरांमुळे सप्टेंबर महिन्याचा घाऊक महागाई निर्देशांक वाढला