महाराष्ट्र

maharashtra

शेअर बाजाराने मोडले सर्व विक्रम, सेन्सेक्स ऐतिहासिक उंचीवर

By

Published : Oct 31, 2019, 12:02 PM IST

Updated : Oct 31, 2019, 3:28 PM IST

या आठवड्यात लागोपाठ तिसऱ्या सत्रात शेअर बाजार तेजीत चालत आहे. सेन्सेक्सने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत.

share market

मुंबई - सेन्सेक्स आज ऐतिहासिक उंचीवर जाऊन पोहोचला आहे. या आठवड्यात लागोपाठ तिसऱ्या सत्रात शेअर बाजार तेजीत चालत आहे. सेन्सेक्सने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. आज शेअर बाजार सुरू झाल्यानंतर २८० अंकाची वाढ होऊन सेन्सेक्स ४०.३३५.८६ पोहचला आहे.

सेन्सेक्स तब्बल २८० अंकांनी वाढून ४०,३३५.८५ वर पोहोचला. तर, निफ्टी ११,९२१.३० वर पोहोचला. गुंतवणूकदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने बाजारात आशादायी चित्र तयार झाले आहे.

केंद्र सरकार लाभांश वितरण कर (डीडीटी), दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर (एलटीसीजी) आणि रोखे उलाढाल कर (एसटीटी) या गुंतवणूकदारांवर भार असलेल्या कर तरतुदी रद्दबातल करण्याबाबत गांभीर्याने विचार करीत आहे. लवकरच या संबंधाने अधिकृतपणे घोषणा केली जाईल, अशी बाजारात आशा आहे. यापूर्वी कंपनी करात केंद्र सरकारने केलेल्या कपातीने बाजाराचा मूड पालटण्यात मोठे योगदान दिले आहे. यामुळे शेअर बाजार वधारला आहे.

Last Updated : Oct 31, 2019, 3:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details