नवी दिल्ली - देशातील आघाडीचा असलेला मुंबई शेअर बाजाराने आज जागतिक भांडवली बाजारात पोहोचण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) शाघांय शेअर बाजाराबरोबर आज सामंजस्य करार केला आहे. या करारामधून दोन्ही शेअर बाजारांना एकमेकांना सहकार्य करणार आहेत.
बीएसईचा शांघाय शेअर बाजाराबरोबर सामंजस्य करार; माहितीची करण्यात येणार देवाण-घेवाण - मराठी बिझनेस न्यूज
बीएसई आणि शांघाय शेअर बाजार सहकार्य करणे तसेच बाजाराचा विकास करण्यासाठी संयुक्तरित्या संशोधन करणार आहे. तसेच छोट्या आणि मध्यम व्यवसायांना मदत करण्यासाठी पावले उचलणार आहेत.
बीएसई आणि शांघाय शेअर बाजार सहकार्य करणे तसेच बाजाराचा विकास करण्यासाठी संयुक्तरित्या संशोधन करणार आहे. तसेच छोट्या आणि मध्यम व्यवसायांना मदत करण्यासाठी पावले उचलणार आहेत. याशिवाय दोन्हीमध्ये कंपन्यांची नोंदणी करणे, दोन्हीमध्ये ट्रेडिंगसाठी संयुक्त माध्यम उपलब्ध करून देणे यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
बीएसई-शांघाई कराराचा जागतिक गुंतवणूकदारांना लाभ होणार आहे. दोन्ही शेअर बाजारामध्ये माहितीची देवाण-घेवाण आणि सहकार्य करण्यात येणार असल्याचे बीएसईचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी सांगितले. मुंबई शेअर बाजार आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. या शेअर बाजाराची स्थापना १८७५ मध्ये स्थापना झाली आहे.