मुंबई- फ्रँकलिन टेम्पलेटन म्युच्युअल फंडने (एफटीएमएफ) सहा कर्ज योजना बंद करण्याचा घेतलेला निर्णय हा टोकाचा आहे. त्यामुळे गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाल्याचे अॅन्मी या शेअर दलालांच्या संघटनेने म्हटले आहे. अशा स्थितीत सेबी आणि वित्तीय मंत्रालयाने बाजार गुंतवणूकदारांसाठी हस्तक्षेप करावा, अशी संघटनेने मागणी केली आहे.
एफटीएमएफच्या निर्णयाने त्यांच्या गुंतवणूकदारांसह इतर कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना चिंताग्रस्त केले आहे. लाखो गुंतवणूकदारांनी कष्टाने कमविलेल्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी सेबी आणि वित्त मंत्रालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंज मेंबर्स ऑफ इंडियाने (अॅन्मी) केली आहे.
एफटीएमएफ योजनेमध्ये काय समस्या होती, हे जाणून घेण्याकरता तज्ज्ञांची समिती नेमावी, अशी संघटनेने मागणी केली आहे. डेबिट म्युच्युअल फंडमध्ये लोक जोखीम घेत विश्वास ठेवतात. अशा प्रकारे कृत्य केल्याने २४ लाख कोटींच्या असलेल्या उद्योगांवरील विश्वास कमी होवू नये, असे अॅन्मीने म्हटले आहे.