मुंबई - शेअर बाजार निर्देशांक ५८२ अंशाने वधारून ३९,८३१.८४ वर बंद झाला. केंद्र सरकार शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना लागू असलेल्या एलटीसीजी, एसटीटी आणि डीडीटीच्या करात सवलत देण्याची शक्यता आहे. या वृत्तानंतर शेअर बाजार आणि निफ्टीच्या निर्देशांक वधारला आहे.
निफ्टी १६० अंशाने वधारून ११,८७७ वर पोहोचला. ऑटो आणि मेटलचे शेअर वधारले. मीडिया वगळता सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली. शेअर बाजारामधील गुंतवणुकीवर लागणाऱ्या कर रचनेत बदल करण्यावर पंतप्रधान कार्यालय विचार करत आहे.