नवी दिल्ली - श्रीमंतीचे प्रतीक मानली जाणाऱ्या बीएमडब्ल्यू वाहनांच्या विक्रीला मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा फटका बसला आहे. बीएमडब्ल्यू वाहनांच्या विक्रीत जानेवारीत १३.८ टक्क्यांची घट झाली आहे. जानेवारीत ९,६४१ बीएमडब्ल्यू वाहनांची विक्री झाली आहे. गतवर्षी ११,६०५ बीएमडब्ल्यू वाहनांची विक्री झाली होती.
गतवर्षी ९ हजार बीएमडब्ल्यू आणि ६४१ मिनी युनिटची विक्री झाली होती. तर २,४०३ बीएमडब्ल्यू मोटररॅड मोटरसायकलची विक्री झाली होती.
बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ रुद्रतेज सिंह म्हणाले, २०१९ वर्ष हे वाहन उद्योगासाठी सोपे नव्हते. वाहन क्षेत्र अडचणीमधून जात असताना आम्ही २०२० वर्षासाठी तयार झालो आहोत. बीएमडब्ल्यू ३ श्रेणी आणि बीएमडब्ल्यू एक्स१ श्रेणीतील वाहने नव्या ग्राहकांनी घ्यावी, यासाठी केलेल्या प्रयत्नात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. तसेच बीएमडब्ल्यू एक्स५, बीएमडब्ल्यू६ श्रेणीतील ग्रॅन टुरिझ्मो आणि बीएमडब्ल्यू ७ श्रेणीतील वाहने अद्ययावत (अपग्रेड) करण्यात आली आहेत. वाहनांचे नवे मॉडेल आणि मागणी असलेल्या ब्रँडसाठी चांगले वातावरण असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.