महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

भारत बाँड ईटीएफला गुंतवणूकदारांकडून अपेक्षेहून १.७ टक्के अधिक प्रतिसाद - ETF news in Marathi

शेअर बाजारात सूचिबद्ध केलेल्या भारत बाँड ईटीएफमधून केवळ एएए मानांकन असलेल्या सरकारी कंपन्यांच्या बाँडमध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे.

Bharat Bond ETF
भारत बाँड ईटीएफ

By

Published : Dec 21, 2019, 6:12 PM IST

नवी दिल्ली - देशाचा पहिला कॉर्पोरेट बाँड असलेल्या भारत बाँड ईटीएफला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. बाँड घेण्याची शेवटची मुदत शुक्रवारी संपली आहे. गुंतवणुकदारांच्या प्रतिसादामुळे बाँडमधून १२ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. बाँडमधून ७ हजार कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा होती.

विविध प्रकारच्या श्रेणीमधील गुंतवणुकदारांनी बाँडला चांगला प्रतिसाद दिल्याचे डीपीआयपीएएमचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी ट्विट केले. शेअर बाजारात सूचिबद्ध केलेल्या या बाँडमधून केवळ एएए मानांकन असलेल्या सरकारी कंपन्यांच्या बाँडमध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे.

संबंधित बातमी वाचा-देशाचा पहिला कॉर्पोरेट बाँड १२ डिसेंबरला होणार लाँच

तीन आणि दहा वर्षांची मुदत असलेले दोन्ही बाँड शेअर बाजारात सूचिबद्ध केलेले आहेत. ज्या गुंतवणूकदारांकडे डिमॅट खाते नाही, त्यांच्यासाठी भारत बाँड फंडस ऑफ फँडस सुरू करण्यात आला आहे.

संबंधित बातमी वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ईटीएफ लाँच करण्याला मंजुरी

ABOUT THE AUTHOR

...view details