मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक सलग सहाव्या सत्रात घसरला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५८८ अंशाने तर निफ्टीचा निर्देशांक १८३ अंशाने घसरला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५८८.५९ अंशाने घसरून ४६,२८५.७७ वर स्थिरावला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सहा सत्रात ३,५०६.३५ अंशाने घसरला आहे. निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर १८२.९५ अंशाने घसरून १३,६३४.६० वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक सहा सत्रात १,०१०.१० अंशाने घसरला.
हेही वाचा-केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून संसदेत २०२०-२१ आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर
मुंबई शेअर बाजारासह निफ्टीच्या निर्देशांक आज अत्यंत अस्थिर राहिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत केंद्रीय आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२०-२१ सादर केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर