मुंबई- शेअर बाजार खुला होताना १०३.१३ अंशाने वधारून ४०,८८२.७१ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक २२.५० अंशाने वधारून १२,०४०.९० वर पोहोचला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गुरुवारी ७०.७० अंशाने घसरून स्थिरावला होता. तर निफ्टी बंद होतानाही निर्देशांकही २४.८० अंशानेही घसरला होता.
हेही वाचा-आरबीआयकडून रेपो दर 5.15 टक्के कायम; जीडीपीतील अंदाजित आकडेवारीत कपात
भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना गुरुवारी अनपेक्षितपणे रेपो दर 'जैसे थे' ठेवला आहे. तर आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी लवचिक धोरण पुढेही सुरुच ठेवणार असल्याचे पतधोरण जाहीर करताना म्हटले. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये जीडीपीचा विकासदर हा पूर्वीच्या अंदाजाप्रमाणे ६.१ टक्के न राहता ५ टक्के राहील, असे आरबीआयने म्हटले आहे.