नवी दिल्ली - वाहन क्षेत्रातील कंपन्यांची एप्रिल महिन्यात शून्य टक्के विक्री झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे ठप्प असून त्याचा फटका वाहन उद्योगक्षेत्राला बसला आहे.
मारुती कंपनीचे एकही वाहन विकले गेले नाही
लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात एकही कार विकण्यात आली नाही. कार विक्री शून्य टक्के झाली आहे. देशातील बंदरे सुरू झाल्यानंतर गाड्यांची वाहतूक करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
MG Motorशून्य टक्के विक्री
लॉकडाऊनमुळे सर्व गाड्यांची विक्री बंद आहे. डिलरशिप बंद आहे. तसेच उत्पादनही थांबले आहे. मे महिन्यात गाड्याचे उत्पादन वाढेल अशी कंपनी प्रशासनाने व्यक्त केली आहे.
महिंद्रा कंपनी
वाहन उद्योगातील आघाडीची कंपनी महिंद्राने एप्रिल महिन्यात शून्य टक्के विक्री नोंदविली आहे. मात्र, एप्रिल महिन्यात कंपनीने ७३३ वाहने इतर देशांत निर्यात केल्याचे सांगितले. डिलर, सप्लायर्स आणि इतर भागधारकांशी मिळून आम्ही काम करत आहोत, असे वाहन विभागाने कार्यकारी अधिकारी विजय नाकरा यांनी सांगितले. महिंद्रा ट्रक्टरची विक्री ८३ टक्क्यांनी घसरल्याचे कंपनीने सांगितले आहे.